अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक बातमी

अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक बातमी
Published on

PNE26W41243 सोलापूर ः हाती फकीरा गळ्यात हलगी अन् अण्णाभाऊंची हुबेहूब वेशभूषा साकारणाऱ्या पुणे येथील दीपक साठेंना पाहून अनेकांना स्वत: अण्णा भाऊच आल्याचे भासत होते अनेकांनी ही आठवण कॅमेऱ्यात टिपली.
PNE26W41240 - मिरवणुकीतील अनुयायांचा जनसागर
PNE26W41241 - साठी पार केलेल्या आजी केशरबाई उडानशिवे व नातू रूद्र लोंढे दांडपट्टा फिरवून क्रांतिवीर लहुजी साळवेंचा वारसा सादर करताना
PNE26W41242 - बारदान्याच्या कपड्यांची फॅशन करून रील बनवताना शिवराज जोगू, दिनेश बोद्धुल
PNE26W41248 - पोस्टाचे ४ रुपयांचे अण्णाभाऊंचे तिकीट व अंधारातून शिक्षणाच्या उजेडाकडे नेणारा संदेश देणारा एसआर ग्रुपचा देखावा

सोलापुरातील मिरवणुकीत अवतरले ‘लोकशाहीर’

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत विविध देखावे; आजी-नातवाच्या दांडपट्टा कलेने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : हलगीचा नाद, अण्णाभाऊंच्या वेशातील दीपक साठे, बारदान्यापासून तयार केलेला भन्नाट वेष आणि हातात दांडपट्टा घेऊन मिरवणुकीसमोर उभे असलेले आजी-नातू... अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीच्या मिरवणुकीत लक्षवेधी प्रसंगांनी रंग भरला. स्ट्रगली यूथ फाऊंडेशन, लोकशाहीर प्रतिष्ठान, नवरंग संस्था आणि लहुजी शक्ती सेना यांच्या कादंबरी देखाव्यांनी साहित्याचा आशय रस्त्यावर आणला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शोषित समाजाला दिशा, रशिया पोवाडा अशा आशयपूर्ण देखाव्यांतून इतिहास, संघर्ष आणि सामाजिक वास्तवाची मांडणी झाली. दुसरीकडे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला वैचारिक विरोध नोंदवत ‘कास्टलेस इंडिया’चा संदेश देण्यात आला. त्यामुळे ही मिरवणूक केवळ जल्लोषाची न राहता साहित्य, शौर्य आणि सामाजिक विचारांचीही झाली.
-------------------
कादंबरीचे पान उघडले अन् देखावे रस्त्यावर आले!
अण्णाभाऊंच्या साहित्याचा आणि सामाजिक जाणिवेचा जागर करणारे देखावे यंदाच्या मिरवणुकीचे ठळक आकर्षण ठरले. स्ट्रगली यूथ फाऊंडेशन, लोकशाहीर प्रतिष्ठान, नवरंग संस्था आणि लहुजी शक्ती सेना यांनी कादंबरी देखावे साकारले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शोषित समाजाला दिशा आणि रशिया पोवाडा अशा विषयांना देखाव्यांतून स्थान देण्यात आले. त्यामुळे मिरवणूक पुढे सरकत असताना अण्णाभाऊंच्या साहित्यविश्वासोबतच सामाजिक संघर्ष आणि चळवळींचे संदर्भही नागरिकांसमोर येत होते. साहित्यिक आशयाला दृश्यरूप देत सामाजिक इतिहास, संघर्ष आणि शोषितांच्या प्रश्नांचा जागर करण्यात आला.
-------------------
बारदान्यापासून कपडे; ‘क्रेझी स्कॉड’चा लूक चर्चेत
बारदान्यापासून कपडे तयार करणे, ही कल्पनाच अनेकांसाठी कुतूहलाची ठरली. शिवराज जोगू आणि दिनेश बोद्धुल यांनी बारदान्यापासून कपडे तयार करून ‘क्रेझी स्कॉड’साठी केलेली वेशभूषा ‘कॅमेरा पॉइंट’ ठरली. मिरवणुकीत ही वेशभूषा दिसताच अनेकांचे मोबाइल बाहेर आले.
--------------------
६० पार आजी अन् नातवाच्या हातात दांडपट्टा!
वयाची साठी ओलांडलेल्या केसरबाई उडाणशिव यांनी नातू रुद्र लोंढे याच्यासोबत प्रत्येक मिरवणुकीसमोर दांडपट्टा चालविला. वयाला न जुमानता दांडपट्ट्याची कला सादर करत त्यांनी लहुजींचे शिष्य असल्याचे कृतीतून दाखवून दिले. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेकजण पुढे आले.
--------------------
हलगीच्या तालावर ‘अण्णाभाऊ’च समोर!
पुण्याचे दीपक साठे अण्णाभाऊ साठे यांच्या वेशभूषेत हाती हलगी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले. त्यांची हि वेशभूषा मिरवणुकीत पाहून प्रत्यक्ष साहित्यरत्नच मिरवणुकीत प्रबोधन करत असल्याचा भास झाला. त्यांच्या रूपामुळे जणू क्षणभर काळ उलटला... अण्णाभाऊच समोर आले, असा भास अण्णाभाऊंच्या वेशातील दीपक साठे आणि हातातील हलगीने जुन्या आठवणी जागवल्या.
-------------------
आरक्षण उपवर्गीकरणाला वैचारिक विरोध
मिरवणुकीत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणारी भूमिका मांडण्यात आली. ‘कास्टलेस इंडिया’चा संदेश देत सामाजिक समतेचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे उत्सवाच्या जल्लोषासोबतच सामाजिक प्रश्नावर वैचारिक भूमिका मिरवणुकीतून मांडली गेली.
-----------------------
महिला डीजेंचा प्रथमच सहभाग
यंदाच्या मिरवणुकीत प्रथमच सहा ते सात महिला डीजे सहभागी झाल्या. महिलांच्या या सहभागाने मिरवणुकीला आणखी एक वेगळा पैलू मिळाला.
-------------------------
अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर; मिरवणुकीला आशयाची धार
जयंतीच्या मिरवणुकीत साहित्यिक देखावे, ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक प्रश्न, शौर्यकला आणि कल्पक वेशभूषा यांचा अनोखा मेळ पाहायला मिळाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून रशिया पोवाड्यापर्यंत, शोषित समाजाच्या प्रश्नांपासून ‘कास्टलेस इंडिया’च्या संदेशापर्यंत विविध विषयांनी मिरवणुकीला आशय दिला. प्रसंगांनी भरलेली ठरली.
----------------------
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती आणि क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना आणि इतर संघटनांच्या वतीने या मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक मार्गे, रामलाल चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, चार हुतात्मा पुतळा, मेकॅनिकी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मिरवणुकीची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com