Pune : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भरडधान्य पदार्थ महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whole grains

Pune : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भरडधान्य पदार्थ महोत्सव उत्साहात

हडपसर : हे वर्ष जागतिक पातळीवर 'भरडधान्य वर्ष' म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अण्णासाहेब मगर महाविद्यालयात, वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने 'भरडधान्य पदार्थ महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रदर्शनात 'सावा' या भरडधान्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांचे प्रकार मांडण्यात आले होते. सध्याच्या फास्ट पुढच्या जमान्यात पारंपारिक अन्नपदार्थ नामशेष होत चालले असून, मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे अहितकारक आहे. 'भरडधान्य' हे जीवनसत्वयुक्त असल्याने आरोग्याच्या दृष्टीने दैनंदिन आहारात त्याचा समावेश असणे गरजेचे आहे. नव्या पिढीमध्ये त्याबाबत जागृती करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

उपाध्यक्ष घाडगे म्हणाले, "लोकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. त्याकरिता या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे.'महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले, "लोप पावत चाललेली आरोग्यपूर्ण माहिती अशा महोत्सवाच्या माध्यमातून वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांकडून समाजापर्यंत पोहचवली जात आहे. महाविद्यालयासाठी हे गौरवास्पद आहे."

वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. किरण रणदिवे, महोत्सवाच्या समन्वयक प्रा. डॉ. दानई तांभाळे, सहसमन्वयक प्रा. भावना जगताप आदींनी महोत्सवाचे संयोजन केले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला होता

टॅग्स :puneFood GrainsCollege