अण्णासाहेब मगर यांचे नाव दापोडी-निगडी मार्गाला देणार

अण्णासाहेब मगर यांचे नाव दापोडी-निगडी मार्गाला देणार
Published on

पिंपरी, ता. २८ : ‘‘पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार कै. खा.अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचा गौरव म्हणून महापालिकेच्या ताब्यात असलेल्या दापोडी ते निगडीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाला त्यांचे नाव देण्यात येईल’’, अशी घोषणा महापौर रवी लांडगे यांनी केली.
अण्णासाहेब मगर यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त अंशुल प्रकाशनच्यावतीने चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक शीतल शिंदे, अमित गावडे, नगरसेविका अरुणा लंगोटे यावेळी उपस्थित होते.
दापोडी ते निगडी पर्यंतचा महामार्ग देखभाल दुरुस्ती विकासासाठी महापालिकेच्या ताब्यात असल्याने अडचण येणार नसून प्रशासनाशी बोलून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. विजय जगताप, डॉ. सीमा काळभोर यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून बुधवार (ता.२९) पर्यंत हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे. संभाजी बारणे, नंदू भोगले, वेदांत काळभोर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com