
Pune News : दरबारात नाही तर निवडक तज्ज्ञांमध्ये चर्चेला या अंनिसचे प्रत्युत्तर
पुणे : बागेश्वर बाबा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दरबारात येऊन आमने समाने करण्याचे आव्हान दिले आहे. पण बागेश्वर बाबा यांचे भक्त सोशल मिडियावर हिंसक प्रतिक्रिया देतात, स्वतः बाबांचे वक्तव्य हे चिथावणीखोर असतात. त्यामुळे अशा स्थितीत ‘दूध का दूध पानी का पानी’ करणे शक्य नाही.
बाबांनी दिलेले आव्हान ही पळवाट असून, त्यांनी निवडक लोकांमध्ये चर्चा करण्याची तयारी दाखवावी असे प्रत्युत्तर अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी दिले आहे. बागेश्वर बाबांनी पत्रकार परिषदेत दिलेले आव्हान दिशाभूल करणारे आहे. बाबांच्या सत्संगाच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी असणारी शासन यंत्रणा,
पोलिस यंत्रणा ही बाबांच्या वक्तव्याची आणि दाव्यांची सिद्धता चाचणी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे बाबांनी सोयीच्या ठिकाणी, वकील, पोलिस, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रातील निवडक तज्ज्ञ मंडळींच्या समोर त्यांचे दावे सिद्ध करावेत आम्ही २१ लाखाचे बक्षीस देऊ असे आव्हान विशाल विमल यांनी दिले आहे.