esakal | 'जरंडेश्वर'च्या मालकाचे नाव जाहीर करावे; सोमय्यांचे अजित पवारांना आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

'जरंडेश्वर'च्या मालकाचे नाव अजित पवारांनी जाहीर करावे

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : जरंडेश्वर कारखान्याच्या मालकांचे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर करावे असे आव्हान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिले. दरम्यान जरंडेश्वर कारखान्याच्या भेटीदरम्यान काही गुंडानी आपला हात धरुन ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणीही अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा: NCBला रेव्ह पार्टीची माहिती देण्यासाठी गेलो होतो: भानुशाली

दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असल्याचे आज लोकायुक्तांसमोर नमूद केल्याची माहितीही सोमय्या यांनी दिली. बारामतीच्या भाजप कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उध्दव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सोमय्या म्हणाले, अजित पवार यांना माझी विनंती आहे की तुम्ही जरंडेश्वरचा मालक कोण याचा खुलासा करावा, यात सतरा कंपन्या आहेत, या कंपन्यांचे मालक कोण आणि कोणाचे कोणाशी काय संबंध याचा खुलासा होण्याची गरज आहे. अनेक स्तर करुन हा कारखाना घेण्याची गरजच काय होती, बेनामी व सत्तेचा दुरुपयोग करुन हा कारखाना ताब्यात घेतल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी पवारांवर केला.

गुरु कमोडिटीला 65 कोटी रुपये अजित पवार यांनी मागच्या दाराने देण्याचे कारण काय होते, एवढे स्तर करुन हा कारखाना का त्यांनी ताब्यात घेतला याचा खुलासा त्यांनी करावा असे आव्हान दिले. शरद पवार यांचा डोकेबाज असा उल्लेख त्यांनी केला, मी डोकेबाज म्हणतोय जनता त्यांना दुस-या नावाने ओळखत असेल तर माहिती नाही, असा खोचक उल्लेख करत त्यांनी पवार कुटुंबियांकडून मला बरेच काही नव्याने शिकायला मिळत असल्याचेही नमूद केले.

हेही वाचा: रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

नारायण राणे, किंवा इतरांबाबत मला प्रश्न विचारला जातो, राणेंच्या बंगल्याचा विषय राज्याच्या पर्यावरण विभागाकडे आहे, असे ते म्हणाले. आपण केलेल्या घोटाळ्यांपासून लक्ष विचलित करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तुम्ही ईडीचे प्रवक्ते असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केल्याचे नमूद केल्यावर लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

चाळीस घोटाळे बाहेर काढले...

ठाकरे सरकारमधील 16 नेत्यांचे 40 घोटाळे आपण पुढे आणले असून त्या पैकी 34 प्रकरणात तक्रारी दाखल केल्या आहेत. यात चार अधिकारीही सहभागी असून या पुढील काळात आणखी काही प्रकरणे बाहेर येतील, असे सोमय्या म्हणाले.

loading image
go to top