
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ‘इम्प्रेशन्स’ या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे - सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ‘इम्प्रेशन्स’ या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २२ ते २४ डिसेंबर दरम्यान विद्यापीठाच्या आवारात हा महोत्सव पार पडणार आहे.
रेखाटन, नृत्यकला, गायन ते शायरीपर्यंत सर्व प्रकारच्या स्पर्धांद्वारे युवा पिढीतील कला-कौशल्यांना एक हक्काचे व्यासपीठ म्हणून इम्प्रेशन्सची निराळी ओळख आहे. २०१६ मध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या महोत्सवाची ख्याती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली असून, यंदा महोत्सवाने सातव्या वर्षात यशस्वी प्रदार्पण केले आहे.
आतापर्यंत सचिन पिळगावकर, सुबोध भावे, पंकज त्रिपाठी, सुमित राघवन, विक्रम गोखले, स्वप्निल जोशींसारख्या हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांसह, महेश काळे, अनुव जैन, राकेश चौरसिया शौनक अभिषेकींसारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांनीही हजेरी लावली आहे. रशिया व अमेरिकेसारख्या देशातून आलेल्या प्रतिष्ठित कलाकारांनीदेखील स्पर्धकांचे मूल्यांकन करून सहभाग घेतला आहे. साधारण १५ हजाराहून अधिक युवक-युवती दरवर्षी इम्प्रेशन्स ला भेट देतात.कोरोना नंतर संपूर्ण महोत्सव आता पुन्हा ऑफलाईन पद्धतीने होत आहे. ट्रॅव्हल पे, बुकिटन्गो, चिंगारी अॅप, कोसोनॉस्ट्रा (गेमएजन्सी) व फ्रॉदर महोत्सवाचे प्रायोजक असून, ‘सकाळ’ माध्यम सहयोगी म्हणून लाभला आहे.
इम्प्रेशन्स २०२२ -
थीम - ‘प्रवाह - एक कलात्मक प्रवास’
महोत्सवाचे प्रतीक - क्लिओ अर्थात सुगरण पक्षी
आयोजन - २२, २३ आणि २४ डिसेंबर
विभाग - सहा
स्पर्धा - २४
अपेक्षीत प्रेक्षकांची संख्या - १५ हजारांपेक्षा जास्त
सहभागासाठी स्कॅन करा - 10917
https://www.impressionscoeptech.com/events/
इम्प्रेशन्स म्हणजे कलाकारांनी कलाकारांसाठी आयोजित केलेला महोत्सव. देशभरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सीओईपीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यंदा शाल्वणी खोलगडे यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.
- आशुतोष मोहरीर, विद्यार्थी माध्यम समन्वयक, इम्प्रेशन्स २०२२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.