
आपली स्टार्टअप आयडिया भन्नाट असेल आणि बाजारात तुम्ही तग धरून असाल, तर आर्थिक मदतीबरोबरच इनक्युबेशन मिळविण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.
‘स्टार्टअप इंडिया’च्यावतीने तीन स्पर्धांची घोषणा
पुणे - आपली स्टार्टअप (Start Up) आयडिया भन्नाट असेल आणि बाजारात तुम्ही तग धरून असाल, तर आर्थिक मदतीबरोबरच इनक्युबेशन (Incubation) मिळविण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. स्टार्टअप इंडियाच्यावतीने मत्स्यव्यवसाय, स्वच्छता स्टार्टअप ग्रॅंड चॅलेंज आणि राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार या तीन स्पर्धांची (Competition) घोषणा केली आहे. काय आहेत स्पर्धा, कसे व्हावे सहभागी याविषयी...
1) मत्स्यव्यवसाय स्टार्टअप ग्रँड चॅलेंज
जलीय अर्थव्यवस्था किंवा मत्स्यव्यवसायाशी निगडित स्टार्टअपसाठी या विशेष स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.
असे असावे स्टार्टअपचे ध्येय
मत्स्यव्यवसायाची उत्पादन क्षमता वाढविणारे
या क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर केंद्रित
मासे आणि मत्स्यव्यवसायाशी निगडित उद्योगांचे ब्रँडिंग करणारे
या क्षेत्रातील पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करणारे
बक्षिसे
विशेष १० स्टार्टअपना २.५ कोटींची बीजराशी
१२ स्टार्टअपना दोन लाखांची ग्रँट
१० स्टार्टअपना नऊ महिन्यांसाठी इनक्युबेशन
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मार्च
2) स्वच्छता स्टार्टअप चॅलेंज
घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेशी निगडित स्टार्टअपसाठी आयोजित स्पर्धा. कमीतकमी तीन महिन्यांपासून स्टार्टअप नफा मिळवीत असावे.
असे असावे स्टार्टअपचे ध्येय
शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरणारे तंत्रज्ञान
दीर्घकालीन सामाजिक परिणाम करणारे डिजिटल सोल्यूशन
मैलापाण्याच्या शुद्धीकरणासाठी तांत्रिक निराकरण
स्टार्टअपमधील सदस्यांना तांत्रिक, व्यावसायिक आणि प्रशासकीय अनुभव असावा
कचऱ्याचा पुनर्वापर, प्लास्टिक वेस्ट, पारदर्शक प्रणाली, सामाजिक जागृती आणि प्रत्यक्ष उपाययोजनांवर भर
बक्षिसे
पहिल्या दहा स्टार्टअपना २५ लाखांचा पुरस्कार
एका वर्षासाठी तज्ज्ञांचे वैयक्तिक मार्गदर्शन
सहभागी होण्याची अंतिम तारीख : ३१ मार्च
3) राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार
देशातील जवळपास सर्वच क्षेत्रांतील स्टार्टअपसाठीचा हा पुरस्कार आहे. १७ विभागांतील ५० उपविभागांतील स्टार्टअपसाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्टार्टअपबरोबर त्यांना मदत करणाऱ्या संस्थांनाही यात सन्मानित करण्यात येणार आहे.
बक्षिसे : स्टार्टअपसाठी
प्रत्येक उपविभागातील विजेत्या स्टार्टअपला पाच लाखांचे अर्थसाहाय्य
ज्या स्टार्टअपमध्ये पायलट प्रोजेक्टची क्षमता असेल अशांना कामही मिळणार
इनक्युबेटर आणि अॅक्सलरेटर्ससाठी :
प्रत्येक विजेत्याला १५ लाख रोख रक्कम
सहभागी होण्याची अंतिम मुदत : १५ एप्रिल
अधिक माहितीसाठी : https://www.startupindia.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
Web Title: Announcement Of Three Competitions On Behalf Of Startup India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..