सेवा क्षेत्र सर्वेक्षण विषयक कार्यशाळा

सेवा क्षेत्र सर्वेक्षण विषयक कार्यशाळा
Published on

पिंपरी, ता. १५ ः सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांच्या अंतर्गत क्षेत्रीय संचालन विभागाच्‍या वतीने वार्षिक निगमित सेवा क्षेत्र सर्वेक्षण विषयावरील कार्यशाळा नुकतीच झाली. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमात प्रादेशिक संचालक डॉ. रुही कुलकर्णी उपस्थित होत्‍या. त्‍यांनी उत्पादन क्षेत्रासाठी घेतल्या जाणाऱ्या वार्षिक उद्योग सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. या सर्वेक्षणातून संकलित होणारी उच्च दर्जाची सांख्यिकी माहिती धोरणकर्त्यांना विकासाभिमुख कार्यक्रमांची आखणी तसेच, भविष्यातील आर्थिक अहवाल तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
कार्यशाळेचा मुख्य भर सहभागी उद्योग प्रतिनिधी, संबंधित भागधारक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तांत्रिक क्षमता वाढविण्यावर होता. विविध सादरीकरणे आणि संरचित प्रशिक्षण सत्रांद्वारे तांत्रिक मार्गदर्शन दिले. उपसंचालक नरेश पाटील, तेजोनिधी भंडारे, दिलीप बटवाल, कर्नल राजेश पाटेकर, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com