इंदापूर तालुक्यात कोरोनाचा कहर, भिगवण परिसरात वाढला धोका

corona1
corona1

पुणे : इंदापूर तालुक्यात आज कोरोनाची आणखी 13 रुग्ण सापडले. त्यामुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे. त्याचवेळी अकोले येथील १० कोरोना रुग्णांच्या संपर्कातील १० व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यात आज कोरोनाची आणखी 13 रुग्ण सापडले. त्यामुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे. तालुक्यात कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १०९ झाली असून, भिगवण येथे आणखी ३ संशयित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे. 

कोरोनाचा संसर्ग सर्वत्र सुरू झाल्यानंतर पहिले ७६ दिवस एक अपवाद वगळता तालुक्यात एकही रुग्ण नव्हता. मात्र, शासनाने सर्वांना आपल्या मूळ गावी जाण्यास परवानगी दिल्यानंतर तालुक्यात संसर्ग सुरू झाला. मागील ३ आठवड्यात तर कोरोनाने कहर करत शंभरी ओलांडली. त्यामुळे तालुक्यातील जेष्ठ नागरिक धास्तावले आहेत. मात्र, कोरोनास घाबरून न जाता त्यास प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी शासन सूचनांचे पालन करावे असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे.

तालुक्यात १५ जुलै रोजी विक्रमी १५ रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या ७६ जणांच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये वरकुटे खुर्द ९, मदनवाडी १, गोतोंडी १, निमगाव केतकी येथील २ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली. 

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील थोरात नगरमधील व्यावसायिकांच्या संपर्कातील ९ व्यक्तींपैकी तीन व्यक्ती, मदनवाडी येथील रुग्णांच्या संपर्कातील एक महिला, भिगवण स्टेशन येथील रुग्णाच्या संपर्कातील एक महिला, अशा एकाच दिवशी पाच रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे भिगवणकरांना धक्का बसला आहे. अकोले येथील १० कोरोना रुग्णांच्या संपर्कातील १० व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.  

भिगवणमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढू लागली आहे. भिगवण येथे १, भिगवण स्टेशनला ५, मदनवाडी येथे १, अकोले येथे १० अॅक्टीव्ह रुग्ण होते. मंगळवारी (ता. २१) यामध्ये भिगवण ३, मदनवाडी १ तर भिगवण स्टेशन १, अशा एकूण पाच रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे भिगवणकरांचा धोका वाढला आहे. भिगवण स्टेशन येथील रुग्णाच्या संपर्कातील २४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी २२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर भिगवण स्टेशन येथील एका महिलेचा व दौंड तालुक्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह 
आला आहे. भिगवण येथील रुग्णाच्या संपर्कातील ९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर ६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

भिगवणमध्ये नव्याने आढळून आलेले रुग्ण हे मुख्य बाजारपेठेतील कापड व किराणा व्यावसायिक असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्याठिकाणी संसर्ग झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भिगवण गाव सील करण्यात आले असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

दरम्यान, अकोले (ता. इंदापूर) येथे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील १० व्यक्तींची चाचणी करण्यात आली होती. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. अकोले ग्रामस्थांनी कोरोना रुग्ण सापडल्यानंतर गावबंदी, फवारणी, सोशल डिस्टसिंग, मास्क आदींचा वापर केला. त्यामुळे रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविता आले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com