esakal | बारामतीकरांनो सावधान, आता कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati.

बारामतीकरांची धडधड कमालीची वाढली असून, समूह संसर्गाच्या दिशेनेच बारामतीची वाटचाल सुरु झाली आहे. याच गतीने जर रुग्णसंख्या वाढत गेली, तर परिस्थिती बिकट होईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. 

बारामतीकरांनो सावधान, आता कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासूनचा रुग्णांचा उच्चांकी आकडा आज बारामतीने गाठला. आज एकाच दिवसात शहर व तालुका मिळून 22 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहे. या वाढत्या आकडेवारीने बारामतीकरांची धडधड कमालीची वाढली असून, समूह संसर्गाच्या दिशेनेच बारामतीची वाटचाल सुरु झाली आहे. याच गतीने जर रुग्णसंख्या वाढत गेली, तर परिस्थिती बिकट होईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

बारामतीत आज दिवसभरात घेतलेल्या 82 नमुन्यांपैकी 22 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. आज रात्री आठ वाजेपर्यंत बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 277 वर जाऊन पोहोचला. आतापर्यंत 18 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज मिळालेल्या रुग्णांमध्ये बारामती शहरातील 14, तर ग्रामीण भागातील 8 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील पणदरे येथील एका वृध्दाचा मृत्यू झाला आहे, त्याचा कोरोनाचा अहवाल आज आला, त्यात तो पॉझिटीव्ह आला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चिंता वाढविणारी आकडेवारी 
बारामतीचे लॉकडाउन संपल्यानंतर बारामतीचे व्यवहार आता सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत सुरु आहेत. शहरातील अनेक भागात दिवसभर गर्दी उसळते. या गर्दीमुळे अनेकांची चिंता वाढत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात राहत नसल्याने व मृत्यूदरही नियमित असल्याने आता नव्याने काही उपाययोजना हाती घेण्याची गरज नागरिकांकडून बोलून दाखविली जात आहे. 

पुरेशी काळजी नाहीच 
लॉकडाउन संपल्यानंतर अनेक नागरिकांकडून विनामास्क फिरणे, सॅनेटायझर्सचा वापर न करणे, गर्दी करणे या मुळे कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. कौटुंबिक सहवासामुळे एकाच कुटुंबातील अनेकांना लागण झाल्याचेही स्पष्ट होत आहे. शहरात घरोघरी जाऊन नगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण केले जात असले, तरी रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात मात्र प्रशासनाला अपयशच येत आहे.