बॅंक डेटा चोरी प्रकरण : गुजरातमधून आणखी एका आरोपीस अटक 

Another accused arrested from Gujarat Bank data theft case
Another accused arrested from Gujarat Bank data theft case

पुणे : काही बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती चोरीच्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला गुजरातच्या वापीमधून अटक केली. पुण्यातील आरोपींना मोबाईल डेटा पुरविण्याचे काम संबंधीत आरोपीने केले होते. न्यायालयाने आरोपीला पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  दिलीप लालजी सिंग (वय 30, रा.वापी, गुजरात) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यापुर्वी पोलिसांनी रविंद्र महादेव माशाळकर (वय 34), आत्माराम हरिश्‍चंद्र कदम (वय 34) मुकेश हरिश्‍चंद्र मोरे (वय 37), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34), रोहन रवींद्र मंकणी (37), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45), सुधीर शांतीलाल भटेवरा उर्फ जैन (वय 54), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42), परमजित सिंग संधू (42), अनघा अनिल मोडक (वय 40) यांच्यासह आणखी काही जणांना अटक केली होती. 

विद्यार्थ्यांनो, परीक्षेबाबत तक्रार नोंदवा ४८ तासात; पुणे विद्यापीठाकडून नियमावली जाहीर​

आयसीआयसीय, एचडीएफसी व अन्य बॅंकांमधील नागरीकांच्या सक्रीय व निष्क्रीय बॅंक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती आरोपींनी काही व्यक्तींच्या मदतीने बेकायदेशीर व अनधिकृतपणे चोरली होती. हिच गोपनीय माहिती पुण्यातीलच काही व्यक्तींना विक्री करण्यासाठी आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 16 मार्च रोजी अटक केली होती. आरोपींकडे असलेल्या ग्राहकांच्या बॅंक खात्यामध्ये तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये होते. हिच रक्कम आरोपी चोरी करणार होते, त्यापुर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन काही जणांना अटक केली होती. तसेच आणखी तपासही पोलिसांकडून सुरू होता. 

म्यानमारच्या लोकांचे भारतात स्थलांतर, परिस्थिती बिघडेल; संयुक्त राष्ट्रांचा इशारा​

दरम्यान, या प्रकरणामध्ये आरोपींना मोबाईल डेटा पुरविण्याचे काम गुजरातमधील वापी येथील एकाने केल्याचे आरोपींच्या चौकशीत पुढे आले होते. त्यानुसार, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांचे पथक गुजरातमधील वापीमध्ये गेले होते. पोलिसांनी त्यास अटक केली. त्यानंतर त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यास 5 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे कुमार घाडगे यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com