
पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एका आरोपीस रविवारी अटक केली.
म्हाडा पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक
पुणे - पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एका आरोपीस रविवारी अटक केली. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे म्हाडाप्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता अकरावर गेली आहे.
कांचन श्रीमंत साळवे (वय 31, रा. नागसेन नगर, धानोरा, बीड) अशी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा संचालक डॉ.प्रितीश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी), अंकुश रामभाऊ हरकळ व संतोष लक्ष्मण हरकळ या दोघांना प्रारंभी अटक केली होती.
देशमुखच्या घरझडतीमध्ये 2020 च्या टिईटी परीक्षेत अपात्र झालेल्या काही विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे जप्त केली होती. त्यानंतर "टिईटी' प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव ढेरे यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली, त्यानंतर "म्हाडा' प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केली होती. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या सानप बंधुच्या संपर्कात कांचन साळवे हा एजंट होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी साळवे यास बीडमधील धानोरा येथून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Web Title: Another Arrested In Mhada Paper Leakage Case Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..