मोसे खुर्द येथील खून प्रकरणातील आणखी एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

मोसे खुर्द (ता. मुळशी) येथील शेतीच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या खून प्रकरणी पौड पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

पिरंगुट : मोसे खुर्द (ता. मुळशी) येथील शेतीच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या खून प्रकरणी पौड पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजू रामभाऊ मरागळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.   काल सकाळी भाऊ सामा मरगळे यांचा खून झाला होता. या प्रकरणी कालच चार आरोपींना अटक केली आहे. राजू रामभाऊ मरगळे हा गुन्हा केल्यानंतर फरार होता.

हेही वाचा- कामगारांसाठी ब्युरो स्थापन करणार, तर धमकविणाऱ्यांविषयी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले...

तो किरकटवाडी जवळील डोंगरात लपून बसला होता. पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल लवटे, श्रीकांत जाधव अब्दुल शेख, संदीप सपकाळ, शंकर नवले, सागर बनसोडे, तुरे, नाना मदने आदींच्या पथकाने राजु मरगळे याला पाठलाग करून पकडले व अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another arrested in Moses Khurd murder case

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: