मुंबईहून खेडमध्ये आलेल्या आणखी एकाला कोरोना 

Corona Test
Corona Test

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्‍यातील चासच्या पापळवाडी येथे मुंबईहून आलेले एक गृहस्थ कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळाला असून, त्यांच्या संपर्कातील 9 जण तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. राक्षेवाडी येथील 5, वडगाव पाटोळे येथील 1, चाकणमधील 1 आणि आता पापळवाडीतील 1, असे मिळून खेड तालुक्‍यात आता 8 कोरोनाबाधित झाले आहेत. तसेच, कडूस येथून मुंबईला पळून गेलेला 1 जण आहे, अशी माहिती खेडचे सभापती अंकुश राक्षे आणि तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईतील एक 49 वर्षीय गृहस्थ आपल्या कुटुंबासह पापळवाडी (चास) येथे राहण्यास आले. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्राथमिक तपासणी केल्यावर ते कोरोना संशयित आढळले. त्यानंतर ते स्वतःच औंध रुग्णालयात दाखल झाले. काल (ता. 25) रात्री त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या 9 व्यक्तींना तपासणीसाठी आज पुण्याला पाठविण्यात आले आहे. चाकणजवळच्या वाडीतील दोन व्यक्तींचा यांमध्ये समावेश आहे. 

कडूसमध्ये मुंबईहून येऊन पुन्हा मुंबईला गेलेला एकजण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मुंबईहून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या कडुसमधील 6 जणांनाही काल चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच, कडूसमध्येच मुंबईवरून आलेल्या अजून एकास लक्षणे आढळल्याने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. राजगुरुनगरच्या जुना मोटार स्टॅंड भागातील, चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकास कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, लक्षणे आढळल्यामुळे राजगुरुनगरमधील आझाद चौकातील एकाचे आणि राक्षेवाडीमधील एकाचे घशातील द्राव तपासणीसाठी 24 मे रोजी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com