Another corona positive patient dies at home in aundh Pune
Another corona positive patient dies at home in aundh Pune

पुण्यात आणखी एका रुग्णाचा बेड न मिळाल्याने मृत्यू; घरातच घेतला अखेरचा श्वास

पुणे : पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या गंभीर परिस्थितीत रुग्णांना बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे. पुण्यात बेड न मिळाल्याने 51 वर्षीय कोरोना रुग्णाचा घरातच मृत्यू झाला आहे. औंध मधील आंबेडकर वसाहतीमध्ये मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.संतोष ठोसर असे मृत व्यक्तीचे त्यांचे नाव आहे. दोन दिवसांपुर्वीच कोथरूडमध्ये कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. 

मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह असलेले संतोष घरातच होते. कुटुंबीयांना गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या सर्व नंबरवर संपर्क साधला, नंबर सतत व्यस्त होते. कोणीही त्याची दखल सुध्दा घेतली नाही. दरम्यान त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यामुळे जवळच्या शास्वत हॉस्पिटल आणि मेडिपॉइंट हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे प्रयत्न केले. परंतु दोन्हीकडे कोव्हिड रुग्ण असल्यामुळे दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर औंध - बोपोडी - बाणेर परिसरातील हॉस्पिटलमध्ये बेडबाबत चौकशी असता एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. अखेर वेळीच उपचार न मिळाल्याने संतोष ठोसर यांनी घरातच अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या कुटुंबार आभाळ कोसळले असून डॉ. आंबेडकर वसाहतीमध्ये शोककळा पसरली होती. रुग्णांना वेळीच बेड उपलब्ध होत नसल्याने आणि महापालिकेच्या हेल्पलाईनमार्फत वेळीच मदत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार​

कोथरूडमध्ये कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू; बेशुध्द पत्नीसाठी 3 तासांनी आली अ‍ॅम्ब्युलन्स

त्रास होतोय म्हणून डॉक्टरचा सल्ला घेत पती-पत्नींनी कोविड तपासणी केली. पण, रिपोर्ट हातात येण्यापूर्वीच पतीचे निधन झाले. हा धक्का सहन न झाल्याने पत्नी बेशुध्द पडली. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी साडेदहा पासूनच फोनाफोनी करत रुग्णवाहिका बोलावली. परंतु, रुग्णवाहिका पोहचायला तीन तास लागले. प्रशासनाच्या या ढीम्म कारभारामुळं नागरिकांनी चीड व्यक्त केली. प्रमोदकुमार मंडल, (वय ३९ रा. केळेवाडी, हनुमाननगर गल्ली नं.१५) असे निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी नीरुदेवी मंडल यांना ससूनमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्या शुध्दीवर आल्या आहेत. त्यांचा कोविड अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.....सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com