बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू; मृतांची संख्या पोहोचली...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

शहरातील 60 वर्षीय महिलेचा आज सकाळी कोरोनाने एका खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला.

बारामती : शहरातील 60 वर्षीय महिलेचा आज सकाळी कोरोनाने एका खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी याबाबत माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

11 जुलैपासून ही महिला त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. 15 जुलै रोजी तिच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. 17 जुलै रोजी तिला कोरोनाचे निदान झाले. त्यानंतर तिला त्रास होत होता, त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील कोरोनाचा हा सहावा बळी आहे. कालच एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेला इतर कोणताही आजार नव्हता. कोरोनाचे निदान झाल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला व तीनच दिवसात मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जशी वाढू लागली तशी आता मृतांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

(Edited By : Krupadan Awale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another one Corona Patient Died in Baramati Pune