esakal | बारामतीतील या गावात सापडला कोरोनाचा रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे एका चाळीस वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बारामतीमधील कोरोना ग्रस्तांची संख्या 26 वर गेली आहे. 

बारामतीतील या गावात सापडला कोरोनाचा रुग्ण

sakal_logo
By
विजय मोरे

उंडवडी (पुणे) : बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे एका चाळीस वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बारामतीमधील कोरोना ग्रस्तांची संख्या 26 वर गेली आहे. 

गोजुबावी येथे कोरोना ग्रस्त सापडलेली व्यक्ती दौंड येथे येथे व्यावसायिक आहे. आई - वडिलांना भेटण्यासाठी ती व्यक्ती शनिवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजता गोजुबावी येथे आली होती.  रविवारी (ता. 21) त्यांना ताप, सर्दी , खोकला व पोटात दुखू  लागल्याने ते दिवसभर घरी झोपून होते. सोमवारी (ता. 22) सकाळी रूई येथील कोविड केअर सेंटरला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा घशातील स्वॅबचा नमुना घेण्यात आला होता. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बारामती प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.  गोजुबावी येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याने गोजुबावीचा महसूल  भाग सील करण्यात येणार असून, पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. उद्या संबंधित कोरोना रुग्णाच्या घरातील व संपर्कात आलेल्या व्यक्तींचे घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.