Pune Bribery Case : दरोड्याच्या आरोपीकडे पोलिसाची लाचेची मागणी; अंमलदारावर गुन्हा दाखल, पुणे 'लाचलुचपत'ची कारवाई
Pune News : पोलिसांनी जप्त केलेले वाहन न्यायालयाकडून परत मिळण्याकरिता दौंड पोलिसांचा अनुकूल अहवाल न्यायालयात सादर करण्याकरिता पोलिस अंमलदार रमशे कर्चे याने संशयित आरोपीकडे पाच हजार रूपयांची मागणी केली होती.
Anti-Corruption Bureau registers case against Pune police officer for bribery from robbery accusedSakal
दौंड : दरोड्यातील संशयित आरोपीकडे लाच मागितल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यातील एका अंमलदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.