
फिर्यादी यांची इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती करणारी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये जाधव याची पत्नी सुपरवायझर म्हणून काम करीत होती.
बायकोवर बलात्कार आणि 20 लाखाची खंडणी; काय आहे प्रकरण
पुणे : खासगी कंपनीच्या मालकाला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाने अटक केली. 20 लाखांची खंडणी घेतल्यानंतरही आणखी 50 लाख रुपयांची मागणी त्याने केली होती. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पण दोन लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
- धक्कादायक! वायसीएम रुग्णालयाच्या शौचालयात सापडले मृत नवजात अर्भक
अविनाश वसंत जाधव (वय 28, रा. दत्तनगर, कात्रज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती करणारी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये जाधव याची पत्नी सुपरवायझर म्हणून काम करीत होती. काही महिन्यांनी त्याच्या पत्नीने फिर्यादीच्या कंपनीमधील नोकरी सोडून दिली. दरम्यान, जाधवने फिर्यादीला फोनद्वारे संपर्क केला. "तुझे माझ्या बायकोबरोबर संबंध आहेत. हे मला माहित असून त्याविषयी तुझ्या घरी सांगून तुझी बदनामी करतो, मला पैसे दिले नाहीस, तर तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करतो,' अशी धमकी त्याने फिर्यादीला दिली होती.
- ना पूर्ण पगार, ना नोकरीची हमी; अन् वरून राजीनामा देण्यासाठी दबाव!
या प्रकारामुळे घाबरुन फिर्यादीने त्यास वेळोवेळी 20 लाख रुपयांची रक्कम दिली होती. त्यानंतर काही दिवसांपासून जाधवने फिर्यादीकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. खंडणी मागण्याचा प्रकार सातत्याने सुरू राहिल्याने फिर्यादी त्रस्त झाले होते. अखेर त्यांनी या प्रकाराबाबत खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दाखल केली. पथकाने सापळा रचून जाधव यास फिर्यादीकडून दोन लाख रुपये स्विकारताना अटक केली. जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने कामगिरी केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited By: Ashish N. Kadam)
Web Title: Anti Extortion Squad Arrested Man Who Take Ransom Company Owner
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..