Russia Chess Championship: आंबेगावच्या अन्वी हिंगेची रशियात चमक! आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक, ऐतिहासिक कामगिरी..

Ambegaon Chess Star Anvi Hinge Shines in Russia With Two Medals: नऊ वर्षांच्या अन्वीची रशियात कमाल! आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णासह रौप्यपदक
Ambegaon Chess Prodigy Anvi Hinge Wins Two Medals at Asian Schools Chess Championship in Tula Russia at Under Nine Level

Ambegaon Chess Prodigy Anvi Hinge Wins Two Medals at Asian Schools Chess Championship in Tula Russia at Under Nine Level

sakal

Updated on: 

-सुदाम बिडकर

पारगाव : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील अन्वी दीपक हिंगे हिने रशियातील तुला येथे पार पडलेल्या आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत भारताच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे रोवले आहेत. अन्वीने मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात जलदगती ब्लिट्झ प्रकारात सुवर्णपदक, तर स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक पटकावले. बुद्धिबळाची महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या भूमीत विविध देशांतील प्रतिस्पर्ध्यांशी लढत मिळवलेल्या या दुहेरी यशामुळे अन्वीच्या आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या आता पंधरावर पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com