'एमपीएससी'च्या परिक्षेबाबत विद्यार्थी म्हणतात...

महेश जगताप
Thursday, 3 September 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आगामी काळात होणाऱ्या परीक्षा कधी घेणार या प्रतीक्षेत विद्यार्थी असतानाच काल आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग आगामी काळात होणाऱ्या परीक्षा कधी घेणार या प्रतीक्षेत विद्यार्थी असतानाच काल आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा कधी होणार याच्या निश्चित तारखा जाहीर न केल्याने परिक्षेच्या तारखा फिक्स करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अचानक आलेल्या कोरोना महामारीमुळे एप्रिल महिन्यापासून आयोगाकडून वेळोवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेमक्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा या महिन्यात होणार होती, त्यामुळे अनेक विद्यार्थी गावाकडून परत शहरात परीक्षेसाठी परतले आहेत. पण आयोगाकडून अचानक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक  विद्यार्थ्यांची आपली आर्थिक परिस्थिती नसतानाही परीक्षा लवकर होणार या आशेवर अभ्यास करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादाही संपत चालली आहे.

विद्यार्थी सागर थिटे सकाळ'शी बोलताना म्हणाला, ''परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार होत्या म्हणून, जेवणाचे हाल होत असतानाही आम्ही शहरात थांबलो. पण आयोग वेळोवेळी परीक्षा पुढे ढकलत असल्याने काय करावे समजत नाही. आम्ही गेली पाच वर्षे अभ्यास करतोय, त्यामुळे आमच्या वयाचाही प्रश्न आयोगाने लक्षात घ्यावा. काल आयोगाने परीक्षा पुढे ढकलताना पुढील कोणत्याही तारखा निश्चित केल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने लवकर निश्चित तारखा ठरवाव्यात.''

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बरीच वर्षे आम्ही अभ्यास करतोय, किती दिवस तुम्ही परीक्षा पुढे ढकलणार त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर परीक्षेच्या तारखा जाहीर करून परीक्षा घ्यावी अशी मागणी अमोल पाटील विद्यार्थ्याने केली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal of students to announce the dates of MPSC examination