सोसायट्यांना दक्षता घेण्याचे आवाहन;पोलिसांकडून रहिवाशांसाठी नियमावली जारी 

सोसायट्यांना दक्षता घेण्याचे आवाहन;पोलिसांकडून रहिवाशांसाठी नियमावली जारी 
Updated on

पुणे - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे त्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी सोसायट्यांमधील रहिवासी, पदाधिकाऱ्यांसाठी पोलिसांनी नियमावली जारी केली. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व बाधित कुटुंबाशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी केले. 
उच्च रक्तदाब, मधुमेह, हदयविकार असलेल्यांची विशेष काळजी घ्यावी. रुग्ण, रहिवासी, संपर्कातील व्यक्ती, निवासी विलगीकरण केलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करावे, असे आवाहनही मोराळे यांनी केले. 


अशी आहे नियमावली 
- आवारात गर्दी टाळा, एकमेकांमध्ये अंतर राखा 
- परदेशातून, परराज्यातून आलेल्यांना विलगीकरणाच्या सूचना द्या 
- घरकामास येणाऱ्या महिलांना अडवू नका, मास्कचा आग्रह धरा; 
मोबाईल, चाव्या व पर्ससाठी त्यांना कापडी बॅग द्या; हात, चेहरा साबणाने स्वच्छ धुवायला सांगा 
- दूध, भाजी, वृत्तपत्रे वितरक, सफाई कर्मचारी, वस्तू विक्रेत्यांचे प्रवेशद्वारावरच तापमान मोजा 
- आवारात येणारी व्यक्‍ती प्रतिबंधित क्षेत्रातील नसावी 
- पावसाळी दुरुस्ती, फर्निचर, विद्युतकामे अल्पकाळ थांबवा 
- नवीन बांधकामे, नूतनीकरणाची कामे तूर्त टाळा 
- लिफ्ट, जिने, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण 
- ऑक्‍सीमीटर यंत्रावर ऑक्‍सिजनची पातळी 95 पेक्षा कमी असल्यास तपासणी करून घ्या 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तातडीचे संपर्क क्रमांक 
100 -   पोलिस नियंत्रण कक्ष 
108  - रुग्णवाहिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com