ऍपलचे पुणे कनेक्‍शन - मेड इन पुणे

समृद्धी धायगुडे
मंगळवार, 17 जानेवारी 2017

टेक्‍नॉलॉजीमध्ये रोज नवनवीन ट्रेंड येतात. या ट्रेन्डमध्ये ऍपल कंपनीची गॅजेट्‌स, स्मार्टफोन आणि त्याच्या ऍक्‍सेसरीज प्रचंड लोकप्रिय आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या व्यवसायाची पाळेमुळे रोवणारा सांगलीचा एक तरुण उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात त्याने आपले बस्स्तान बसविण्यासाठी रोजगारच्या शोधात होता. सुरवातीला छोट्‌या-मोठ्‌या विक्रेत्यांकडे टेक्‍निकल सपोर्टर म्हणून सुरवात केली. हळूहळू या क्षेत्रातील एक मोठी कंपनी उभराण्याचे स्वप्न पाहिले. याच तरुणाचे नाव म्हणजे गौतम शहा.

टेक्‍नॉलॉजीमध्ये रोज नवनवीन ट्रेंड येतात. या ट्रेन्डमध्ये ऍपल कंपनीची गॅजेट्‌स, स्मार्टफोन आणि त्याच्या ऍक्‍सेसरीज प्रचंड लोकप्रिय आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या व्यवसायाची पाळेमुळे रोवणारा सांगलीचा एक तरुण उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात त्याने आपले बस्स्तान बसविण्यासाठी रोजगारच्या शोधात होता. सुरवातीला छोट्‌या-मोठ्‌या विक्रेत्यांकडे टेक्‍निकल सपोर्टर म्हणून सुरवात केली. हळूहळू या क्षेत्रातील एक मोठी कंपनी उभराण्याचे स्वप्न पाहिले. याच तरुणाचे नाव म्हणजे गौतम शहा.

सांगलीच्या या तरुणाने अस्सल पुण्यात "कॅडसी' नावाची कंपनी उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. आज जगभरातील तरुणांना ज्या ऍपल डिव्हाईसने वेड लावले आहे, त्या
कंपनीसाठी "कॅडसी' पोर्टेब्लिटीच्या ऍक्‍सेसरीज पुरवते. या कंपनीचे गौतम शहा यांचा एक टेक्‍निकल सपोर्टरपासून ते एका कंपनीचे सीईओपर्यंत झालेला प्रवास...
ंगणक आल्यानंतर काही काळातच बऱ्याच ऑफिस, घरांमध्ये संगणक आला. त्याच्या बरोबर फ्लॉपी, सीडी, पेन्ड्राइव्ह यासारख्या ऍक्‍सेसरीजचा जन्म झाला. या दरम्यान
गौतम यांनी इंजिनियरिंग शिक्षण घेऊन पुण्यात उच्चशिक्षणासाठी आले. इम्पोर्ट एक्‍सपोर्टचा कोर्स केला. एमबीएसाठी दोनदा प्रवेश परीक्षा दिल्या. कम्युनिकेशन स्किल्सचा अभ्यास केला. या कोर्सेसमुळे त्यांच्या विचारांना दिशा मिळाली.

""शिक्षणाबरोबर एकीकडे नोकरीची संधी मिळाली. नोकरी करताना टेक्‍निकल नॉलेज बरोबर कम्प्युटर मार्केट कसे आहे समजायला मदत झाली. सहा महिने कम्प्युटरचे विविध पार्टस कसे जोडायचे, कुठून आणायचे, ग्राहकांशी कसे बोलायचे, असे विविध अनुभव गाठीशी आले. या क्षेत्रात वावरताना सतत एक विचार होता, स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा. त्या दृष्टीने
पहिल्यांदा सिंगल युजर्सला प्रथम कम्प्युटर विक्रीस सुरवात केली.''

गौतम आपल्या आपल्या व्यवसायाविषयी बोलताना म्हणाले,''प्रत्येक तरुणाने व्यवसाय सुरू करताना दूरदृष्री असणे आवश्‍यक असते. अशी दृष्टी नसेल तर सॅच्युरेशन झाले की, तुमचा व्यवसाय मागे पडतो. मला नेमका कशाचा व्यवसाय करायचा आहे हे नक्‍की होते. संगणक आणि त्याला जोडल्या जाणाऱ्या सर्व डिव्हाईस यांच्यामध्ये एक दुवा असतो. हा दुवा असणाऱ्या सर्व ऍक्‍सेसरीज या माझ्या कंपनीच्या असाव्यात असे मला वाटत होते.

मला नेटवर्किंग बरोबरच म्युझिकची आवड आहे. यासाठी मी आवड आणि सिनायजरसारख्या कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. कम्प्युटर क्षेत्रात सुरवातीपासून दुसऱ्यांचे
ब्रॅन्ड विकले होते. एका अमेरिकास्थित कंपनीबरोबर कामाची संधी मिळाली. या कंपनीचा भारतातील मुख्य वितरक म्हणून मी काम केले. या कंपन्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आंतराष्ट्रीय टेक शोमध्ये सहभागी झालो. या शोमध्ये जाताना नेहमी मला आपल्या देशाचा एकही ब्रॅण्ड नसल्याची खंत वाटत होती. ही खंत माझ्या व्यवसायाला प्रेरणा देण्याचे मुख्य कारण ठरली. स्वत:चा व्यवसाय करण्याचे निश्‍चित केल्यावर पुढील पाच वर्षात संगणक युग कमी होऊन त्याचा पुढील टप्पा मोबाईल स्मार्टफोन,टॅब्लेट, फॅब्लेट, लॅपटॉपचा असणार हे लक्षात आले होते. मोबाईल डिव्हाईस हे तर सगळ्याच मोठ्या कंपन्या करतात, त्यामुळे मोबाईल ऍक्‍सेसरीजचे उत्पादन करणे मला जास्त महत्वाचे वाटले. या ऍक्‍सेसरीजचे उत्पादनामध्येही विविध प्रकार असतात. सिक्‍युरिटी, कॉर्पोरेट स्विच उत्पादने, ऑन डेस्क लागणारी उत्पादने इत्यादी...

त्यावेळी अपकमिंग असलेल्या या ट्रेन्डमध्ये आपले उत्पादन टॉपला असावे असे गौतमला वाटत होते. लॅपटॉप, स्मार्टफोनमध्ये सर्वाधिक क्रेझ असलेला ऍपल कंपनीची डिव्हाईसेसला जगभरातून मागणी असते. या जगविख्यात कंपनीबरोबर काम करयची भुरळ एका कंपनीचा मालक म्हणून मलाही पडली. अर्थातच ही गोष्ट काही सोपी नव्हती. ऍपलसारख्या कंपनीसोबत काम करताना खूप काठिण्य पातळ्या ओलांडणे गरजेचे असते. तुमचे डिव्हाईस ऍपलच्या सर्व डिव्हाईसेसबरोबर जोडण्यासाठी एमएफआय नावाचे सर्टिफिकेट असणे गरजेचे असते. यासाठीची सर्व प्रक्रिया करताना तुमचे शिक्षण, आर्थिक बाजू, तुम्ही किती प्रामाणिक आहात तुमचे उत्पादन किती गुणवत्तेचे आहे हे सर्व तपासून पाहिले जाते. हा व्यवसाय सुरू करताना दूरदृष्टीबरोबर माझी आशीही एक धारणा होती की, ऍपलसारख्या कंपनीसोबत कॅडसीचे नाव जोडले जावे. आज मला ही संधी मिळाली असल्याने जगातील कोणत्याही ऍपल स्टोअरमध्ये कॅडसीचे उत्पादन विकण्याची संधी मला मिळाली आहे.

कॅडसीच्या यशाविषयी बोलताना गौतम म्हणाले,"" या यशानंतर कॅडसी आमच्या नावलौकिकात भर पडली आहेच,पण पुण्याचे ही नाव टेक्‍नॉलॉजीच्या क्षेत्रात मोठे झाले आहे. हा व्यवसाय करताना स्टिव्ह जॉब्ज हा माझा आदर्श आहे. एखादी बंद पडलेली कंपनी पुन्हा इतक्‍या ताकदीने मोठी करू शकतो म्हणल्यावर आपल्या व्यवसायदेखील तितके यश मिळविता येईल अशी खात्री आहे,''

या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांना कानमंत्र देताना म्हणाले,""नकारात्मक विचाराने कोणतेही गोष्ट करू नका, जे कराल त्यासाठी पूर्ण अभ्यास, नियोजन, अनुभवाच्या जोरावर करा.
टेक्‍नॉलॉजी क्षेत्रातील ट्रेन्ड फॉलो करा, सर्वांत महत्वाचे म्हणजे मेहनतीची तयारी ठेवा. जे तरुण या क्षेत्रात येण्यास उत्सुक आहेत त्यांनी शक्‍य असल्यास सर्व आंतराष्ट्रीय प्रदर्शनात
जाऊन तेथील उत्पादने पाहावीत तो ट्रेन्ड फॉलो करावा.''

भारतात कॅडसी कंपनीला आता पाच-दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. भविष्यात टॉप टेक्‍नॉलॉजी प्रदर्शनात कॅडसीचा सहभाग आणखी वाढत राहील. सध्या कॅडसी भारत अमेरिका, तवानसारख्या देशात अस्तित्व आहे. हे अस्तित्व पुढील काही दिवसांत वाढावे यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. जगभरातील टॉप टेन देशांमध्ये तसेच ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट्‌सवर
कॅडसीची उत्पादने येत आहेत. भविष्यात मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीबरोबर जगभरात कॅडेसी काम करेल...

Web Title: apple pune connnetion (Made in pune)

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी