NCC Entry : एनसीसी विशेष प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्जातील बदल | Application Changes under NCC Special Admission Procedure indian army | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Application Changes under NCC Special Admission Procedure indian army

NCC Entry : एनसीसी विशेष प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्जातील बदल

पुणे : भारतीय सैन्यदलाद्वारे आयोजित राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विशेष प्रवेश प्रक्रियेच्या ५४ व्या अभ्यासक्रमांतर्गत अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये ज्‍या उमेदवारांनी सी-सर्टिफीकेटच्या श्रेणीमध्ये ‘सी विथ आरडी परेड’ असा पर्याय निवडला आहे, त्या उमेदवारांनी काही बदल करत ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्‍या तारखेपूर्वी पुन्हा अर्ज करण्याचे आवाहन सैन्यदलाद्वारे करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात एनसीसी विशेष प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली. ही प्रवेश प्रक्रिया पदवीमध्‍ये ५० टक्के गुणांसह एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण करत ‘सी प्रमाणपत्रात’ अ किंवा ब श्रेणी असलेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी आहे.

यामध्ये एकूण ५५ राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी काहींनी ऑनलाइन अर्ज भरताना सी प्रमाणपत्रातील श्रेणीसाठी ‘सी विथ आरडी परेड’ असा पर्याय निवडला होता.

दरम्यान हा पर्याय तांत्रिक बिघाडामुळे चुकून अर्जातील विविध पर्यायांमध्ये जोडला गेला होता. त्यामुळे हा पर्याय निवडलेल्या उमेदवारांनी त्वरित आवश्‍यक सुधारणा करून अर्ज बंद होण्याच्या अंतिम तारखेपूर्वी पुन्हा अर्ज भरण्यास सैन्यदलाने जाहीर करण्यात आलेल्या सूचनेत नमूद करणय्ता आले आहे.

उमेदवारांना यासाठी सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. दरम्यान अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १५ फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :educationArmyNCC