
आरआयएमसीची अर्ज प्रक्रिया सुरू
पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी डेहराडून येथील ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज’साठी (आरआयएमसी) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ३ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया मुला आणि मुलींसाठी असून गेल्या वर्षीपासून मुलींना देखील आरआयएमसीमध्ये प्रवेश मिळत आहे. आतापर्यंत ही प्रक्रिये केवळ मुलांसाठी होती. त्यामुळे लष्करातील विविध पर्याय आता मुलींसाठी खुले झाले आहेत.
आरआयएमसी अंतर्गत ही प्रक्रिया फक्त इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा असून लेखी व मौखिक परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या परीक्षेसाठी सातवीत शिकत असलेल्या किंवा सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. तसेच वयोमर्यादा ही ११ वर्षे सहा महिन्यांपुढे ते १३ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यी यासाठी पात्र आहेत. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
परीक्षेसाठी आवेदनपत्राशी निगडित माहिती www.rimc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना www.mscepune.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.
येथे पाठवा अर्ज
पूर्णपणे भरलेले अर्जाच्या दोन प्रती आवश्यक ते कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देऊळजवळ, पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
आरआयएमसी परीक्षा होणार ३ डिसेंबरला
विषय ः गुण
गणित ः २००
सामान्य ज्ञान ः ७५
इंग्रजी ः १२५
प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- जन्म दाखल्याची छायाप्रत
- आधारकार्ड आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत
- अधिवास प्रमाणपत्र
- बोनाफाईड सर्टीफिकेटचे छायाचित्र मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे
- दोन फोटो.
Web Title: Application Process Of Rimc Starts
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..