esakal | दक्षिण रेल्वेमध्ये हजारों अ‍ॅप्रेंटीस पदांसाठी भरती, असा करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

दक्षिण रेल्वेमध्ये हजारों अ‍ॅप्रेंटीस पदांसाठी भरती, असा करा अर्ज

sakal_logo
By
शरयू काकडे

Railway Recruitment 2021: तुम्हाला जर रेल्वेमध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. दक्षिण रेल्वेमध्ये अ‍ॅप्रेंटीस च्या हजारो पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 3378 पदांसाठी अर्ज करुन यामध्ये सहभागी होऊ शकतात.

दक्षिण रेल्वेमध्ये अ‍ॅप्रेंटीसच्या पद भरतीसाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारिख 30 जून आहे. तुम्ही जर अजून अर्ज पाठविला नसेल तर त्वरित रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा.

हेही वाचा: राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटनाला तोबा गर्दी; अजित पवार उपस्थित

या पदांसाठी होणार भर्ती

नोटिफिशननुसार, रेल्वे च्या चार वर्कशॉप मध्ये एकूण 3378 पदांसाठी पर उमेदवारमध्ये सिलेक्शन केले जाईल. पेरंबूर येथे कॅरिज वर्क्स 936 पद, गोल्डनरॉक वर्कशॉप मध्ये 756 पद, पोदनूरमधील सिग्नल एन्ड टेलीकॉम वर्कशॉप मध्ये1686 पदांसाठी ही भरती होणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

अ‍ॅप्रेंटीसच्या पदांसाठी 30 जून 2021 पर्यंत अर्ज पाठवू शकता. 30 जूनमध्ये संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत अ‍ॅप्लीकेशन फॉर्म ची लिंक अ‍ॅक्टिव्ह असेल. त्या आधी जे लोक अर्ज करतील त्यांचे अर्ज सबमिट होतील. अधिक माहितीसाठी तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंट सेल दक्षिण रेल्वेचे नोटिफिकेशन पाहू शकता.

हेही वाचा: पुण्याबाहेर गेल्यास, करावं लागेल होम क्वारंटाईन : उपमुख्यमंत्री

शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा

या विविध पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता गरजेची आगेय 10वी आणि 12 वी आणि आईटीआई पास युव या पदांसाठी अर्ज करु शकता. वय मर्यादाबाबत सांगायचे झाले तर काही पदांसाठी 15-22 वर्षांची मर्यादा आहे. दर काही पदांसाठी 15 ते 24 वर्षांची मर्यादा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी शुल्क

अ‍ॅप्रेंटीसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी कॅटगरीच्या उमेदवारांना 100 रुपये शुल्क आहे. तर SC-ST दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.

असा करा अर्ज

पात्र उमेदवार सर्वात पहिले दक्षिण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाइटला https://sr.indianrailways.gov.in भेट द्या. त्यानंतर तुम्ही तेथे ऑनलाईन अर्ज करु शकता. ऑनलाईन अर्ज पाठविण्याआधी रेल्वे रिक्रुटमेंट सेल दक्षिण रेल्वेचे नोटिफिकेशन व्यवस्थित वाचेल.

loading image