'आत्मनिर्भर'च्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून चार अधिकारी

corp.jpg
corp.jpg

पुणे : केंद्र सरकारने पथारी व्यावसायिकांसाठी लागू केलेल्या "पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने'ची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेची गतिमान पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या पथारी व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दहा हजार रुपये भागभांडवल कर्ज रूपाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे महापालिकेची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन विभागाच्या वतीने चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्ज योजनेबरोबरच फेरीवाल्यांचे प्रतिनिधी निवडणूक योजना तातडीने राबविणे, नवीन फेरीवाला धोरण 2014 नुसार संगणकीय नोंदणी केलेली नाही, अशा व्यावसायिकांचे यापूर्वी सर्व्हेक्षण यादीमधील नावे संकलित करून त्यांचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आली असल्याचे परिपत्रक महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी काढले आहे. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com