आयएएस अधिकारी प्रविण परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती

गजेंद्र बडे
Tuesday, 4 August 2020

-आयएएस अधिकारी प्रविण परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती

-युनोच्या प्रशिक्षण विभागात जागतिक कार्यक्रम समन्वयकाची जबाबदारी 

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी प्रविण परदेशी यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेत जागतिक कार्यक्रम समन्वयकपदी  (ग्लोबल प्रोग्रामर कोआॅर्डिनेटर)  नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अकरा महिने कालावधीसाठी करण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महायुती सरकारच्या कालावधीत परदेशी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. 

परदेशी हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या २९ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत सोलापूर व लातूरचे जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड व मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्यात विविध खात्यांमध्ये सचिव पदावर काम केले आहे. दरम्यान, याआधी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध विभागात सलग सात वर्षे वरिष्ठ पदांवर काम केले आहे.

मुंबई महापालिकेत त्यांनी आयुक्तपदी १९ मे २०२० पर्यत काम केले आहे. मात्र राज्यात मार्चपासून सुरु झालेला कोरोना संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढू लागला. त्यामुळे परदेशी हे मुंबईतील कोरोना संसर्ग हाताळण्यात कमी पडल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भावना झाली. त्यातूनच त्यांची २० मे रोजी आयुक्त पदावरून पुन्हा मंत्रालयात नगरविकास खात्यात बदली करण्यात आली होती.

आणखी वाचा - शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of IAS officer Pravin Pardeshi to the United Nations