पुणे : महायुतीने केलेल्या नियुक्त्या अजित पवारांकडून रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

- महायुती सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवर केलेल्या चार स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

पुणे : महायुती सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवर केलेल्या चार स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे रिक्त पदे आणि विविध महामंडळावरील नियुक्त्या लवकरच नव्याने केल्या जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. १०)  सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच दूध संघ व इतर संस्थांबाबत काही तक्रारी आलेल्या आहेत. त्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी त्याबाबत चौकशी केली जाईल. या चौकशीत तथ्य आढळून आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. परंतु तथ्य नसेल तर, प्रोत्साहन दिले जाईल, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Video : संभाजीराजे उपोषण करू नका, चर्चा करा; अजित पवारांचं आवाहन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Nominated Members of District Planning Committee has Cancelled