आयुक्तानंतर आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली!

Appointment of Pune District Collector Naval Kishor Ram to the Prime Ministers Office
Appointment of Pune District Collector Naval Kishor Ram to the Prime Ministers Office

पुणे : पुण्याचे तडफदार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. पुण्यातून पंतप्रधान कार्यालयात पोचणारे नवल किशोर राम हे तिसरे अधिकारी ठरले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवल किशोर राम हे 2008 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांची पुण्यात जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. केंद्र सरकारमधील संचालक जे. श्रीनिवासन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या बाबतचा आदेश आज (4 ऑगस्ट) रोजी पाठविला. नवल किशोर चार वर्षांसाठी राज्यातून आता प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारमध्ये जात आहेत. 

पुण्यात नोंदणी महानिरीक्षक आणि पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक असलेले डॉ. श्रीकर परदेशी यांची चार वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाली होती. पुण्यात महापालिका आयुक्त पदावर असताना कुणाल कुमार यांची केंद्र सरकारमध्ये स्मार्ट सिटी मिशनमध्ये संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. आता पाठोपाठ नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे.

कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण पुण्यात असताना, नवल किशोर राम यांनी परिस्थिती सक्षमतेने हाताळली. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. नवल किशोर राम यांची आता बदली झाल्याने पुण्यात जिल्हाधिकारी कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकार त्या बाबतचा आदेश बुधवारी सायंकाळपर्यंत देईल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.  तरुण, तडफदार अधिकारी म्हणूनही नवल किशोर राम यांची ओळख आहे. पुण्यात पाकिस्ताून आलेल्या सिंधी समाजातील सुमारे 700 नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात नवल किशोर राम यांनी पुढाकार घेतला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com