पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, मेट्रोचे काम आता अंतिम टप्प्याकडे जात असताना महापालिकेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आचार्य आनंद ऋषिजी चौकात (पुणे विद्यापीठ चौक) 'समतल विगलक’ (ग्रेड सेप्रेटर) बांधले जाणार असून, त्यासाठीच्या ७० कोटीच्या खर्चाला पूर्वगणनपत्रक समितीने (इस्टिमेट कमिटी) आज (ता. ११) मंजुरी दिली.
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणाऱ्या विगलकाची लांबी कमी केल्याने ३० कोटी रुपयांची बचत होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली.
असा आहे 'समतल विगलक
- हा समतल विगलक शिवाजीनगरकडून औंधच्या दिशेने जाण्यासाठी बांधला जाणार आहे.
- याची लांबी २१० मीटर आणि रुंदी ८ मीटर (दोन लेन) असेल.
- या कामाला अंदाजे ७० कोटी रुपये खर्च येणार असून, दोन वर्षांत ते पूर्ण होईल.
प्रकल्पाचे महत्त्व
- गणेशखिंड रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे, ते लवकरच पूर्ण होईल.
- यामुळे पाषाण आणि बाणेरकडे जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर समतल विगलकाचे काम सुरू होईल.
- गणेशखिंड रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावरून औंधकडे जाणाऱ्या वाहनांना या विगलकाचा वापर करता येईल.
- नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम लवकर पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
खर्चामध्ये होणार बचत
- महापालिकेच्या पूर्वीच्या नियोजनानुसार हा समतल विगलक शासकीय शासकीय तंत्रनिकेतन संस्थेपासून सुरु होणार होता.
- त्यामुळे केवळ गणेशखिंड रस्त्यावरील नागरिकांचा त्याचा वापर करता येणार होता.
- महापालिकेने या समतल विगलकाची लांबी ३०० मीटरने कमी केल्याने बापट रस्त्यावरील वाहतुकीसाठी तो वापरता येईल.
- यामुळे३० कोटी रुपयांची बचत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.