

पुणे - प्रभाग क्रमांक ३९ बालाजीनगर आंबेगाव कात्रज येथे पुणे महापालिका तब्बल ६२ कोटी रुपये खर्च करून चार एकर जागेवर अद्ययावत ‘मॉडेल स्कूल’ उभी करणार आहे. मात्र, ही शाळा चालविण्यासाठी आवश्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे कसे उपलब्ध होणार याची माहिती देण्यात आलेली नाही.