Ardhapur News : अर्धापूरात गारपीट-वादळी वाऱ्याचा तडाखा; ८ गावांतील २५० हेक्टर शेती बाधित, प्रशासनाची पाहणी

अर्धापूर तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे आठ गावांतील सुमारे २५० हेक्टर क्षेत्र बाधित होऊन प्रशासनाने पाहणी करत मदतीची मागणी जोर धरली आहे.
Hailstorm Damages Crops in Ardhapur Taluka

Hailstorm Damages Crops in Ardhapur Taluka

Sakal

Updated on

अर्धापूर : अर्धापूर, (जिल्हा नांदेड)तालुक्यात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून केळी, टरबूज खरबूज, गहू, ज्वारी अंबा व भाजीपाला पिकांना खुप मोठा फटाका बसला आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले असून सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. .नुकसानग्रस्त भागाची तालुका प्रशासनाने पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com