
petrol pump robbery
sakal
मंचर - मंचर-पेठ घाट परिसरात शुक्रवारी (ता. ३) रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत अवसरी पेठ घाटाच्या पायथ्याशी असलेल्या तांबडे मळा गावाजवळ नरेंद्र धुमाळ यांच्या मालकीच्या ऋषी पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडाटाकत दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली. दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत माजवली.