टोल नाक्‍यावर सशस्त्र महिला पोलिस नेमावेत : डॉ. नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्‍त कार्यालयात बुधवारी महिला सुरक्षितेतबाबत बैठक घेतली. विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.

पुणे : महिला वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावरील टोलनाक्‍यांवर सशस्त्र महिला पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच, त्यावर ऑनलाइन व्हिजिलन्स असावा, असे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्‍तांना दिले.

ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे 

डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्‍त कार्यालयात बुधवारी महिला सुरक्षितेतबाबत बैठक घेतली. विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

महिला वाहनचालक किंवा महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अडचणी येतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक टोल नाक्‍यावर 1091 क्रमांक लावण्यात यावा. टोल नाक्‍यावर सशस्त्र महिला पोलिस अधिकारी नेमावेत. जिल्ह्यातील लोणावळा, शिरूर, चाकण, जुन्नरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील अन्य महामार्गांवरही महिला पोलिस अधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात यावी. तसेच, त्यावर ऑनलाइन व्हिजिलन्स असावा. जेणेकरून वाहनचालक किंवा प्रवाशांसोबत चुकीचा प्रकार घडत असल्यास त्याची दखल टोल नाक्‍यावर घेतली जावी, याबाबत विभागीय आयुक्‍तांना सूचना देण्यात आल्या आहेत. तेलंगणा येथील टोल प्लाझावर महिला प्रवाशासोबत घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप

पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृह प्रवाशांना खुले
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवासमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृह वाहनचालकांसह प्रवाशांना खुले असावेत. याबाबत सचिवांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. प्रवासी कोणत्याही पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृह नि:शुल्क वापरू शकतात. सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच, गुगल लोकेटरवर स्वच्छतागृह कोठे आहेत, हे कळली पाहिजेत. सर्व स्वच्छतागृह गुगल लोकेटरवर आली पाहिजेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. 
'आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार', एन्काउंटरनंतर हैद्राबाद पोलिसांची पत्रकार परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Armed women police troops should be deployed on toll