esakal | आमदार रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप          
sakal

बोलून बातमी शोधा

ZP praises MLA Rohit Pawar

आमदार रोहित पवार आणि संजय जगताप यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील, काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे आणि ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांनी अनुमोदन दिले​.

आमदार रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप          

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिपद या मिनी मंत्रालयाचे सदस्य असताना विधानसभेवर निवडून जात राज्याच्या मंत्रालयात पाऊल ठेवल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत खास सत्कार करण्यात आला.

बायकोला मेसेज पाठवला म्हणून, स्केटिंग प्रशिक्षकाचा खून

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हेही उपस्थित होते. आमदार जगताप यांचाही सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी रोहित पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.  

Video : मावळात नऊ जणांवर भानामती; काय आहे प्रकार वाचा 

आमदार रोहित पवार आणि संजय जगताप यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील, काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे आणि ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांनी अनुमोदन दिले. रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. 

विवाहित तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका