Encroachment : लष्कर परिसरात अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका सुरू

पुणे कँटोन्मेंट बोर्ड बरखास्ततीनंतर सर्वत्र लष्कर परिसरात अतिक्रमणाने विळखा घातला आहे.
Encroachment in Pune Army Area
Encroachment in Pune Army Areasakal
Summary

पुणे कँटोन्मेंट बोर्ड बरखास्ततीनंतर सर्वत्र लष्कर परिसरात अतिक्रमणाने विळखा घातला आहे.

कँटोन्मेंट - पुणे कँटोन्मेंट बोर्ड बरखास्ततीनंतर सर्वत्र लष्कर परिसरात अतिक्रमणाने विळखा घातला आहे. यावेळी बोर्डाच्या आठ वार्डापैकी अनेक वार्डात राजकीय वरदहस्त असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत स्वतः लष्कर भागात फेरफटका मारून वाढत्या अतिक्रमणाविषयी लोकांकडून माहिती जाणून घेतली. नागरिक व अतिक्रमणधारकांशी बोलल्यानंतर पाणी कुठेतरी मुरतंय हे लक्षात येताच त्यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण कारवाईचा बडगा सुरू केला.

कँटोन्मेंटच्या मध्यवर्ती भागातील जान मोहम्मद स्ट्रीट, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, महात्मा गांधी रस्ता, ताबूत स्ट्रीट, सेंटर स्ट्रीट, फॅशन स्ट्रीट परिसरातील अनेकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. त्याच बरोबर रस्ते, पदपथांवर बेकायदा उभारलेले पंधरा ते वीस स्टॉल्स जागेवर तोडण्यात आले. पथारी व्यावसायिकांनी कपडे टांगण्यासाठी लावलेले स्टँड, दुकानासमोर थाटलेले लोखंडी रॅक, हातगाड्या आदी साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर अनधिकृत पथारी व्यावसायिकांचा मालही जप्त करण्यात आला आहे. लष्कर पोलिस संरक्षणात ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमणांवरील कारवाईचा बडगा सुरूच राहणार आहे,’ अशी माहिती बोर्डाच्या आरोग्य विभागाचे अधिक्षक आर. टी. शेख यांनी दिली.

लष्कर परिसरात अनेक ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने अतिक्रमणे वाढत असून, त्यामुळे नागरिक आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी माजी नगरसेवक, स्वयंघोषित राजकीय पुढारी, तसेच काही तथाकथित कार्यकर्त्यांना हप्ते चालू असल्याची माहिती स्वतः अतिक्रमण धारकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

बेकायदा पथारी व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी रस्ते व पदपथ अक्षरश: व्यापून टाकले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कारवाई झाल्याने बेकायदा पथारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेले रस्ते मोकळा श्वास घेत असल्याने, बोर्डाने अतिक्रमणांवरील कारवाई सुरूच ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

कारवाई नंतर राजकीय नेत्यांच्या बोर्डात चकरा..

अतिक्रमण कारवाईनंतर काही राजकीय नेते मंडळींनी बोर्डामध्ये चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण कारवाई थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे ही सुब्रत पाल यांनी सांगितले.

फॅशन मार्केट मध्ये विक्रेत्यांची दादागिरी

फॅशन स्ट्रीट परिसरात बेकायदेशीर पद्धतीने टाकण्यात आलेल्या शेडवर कारवाई करत असताना कॅन्टोन्मेंट च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिक्रमण कारवाई करण्यापासून दादागिरी करत काम थांबिण्यास भाग पाडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com