
Army Base Workshop
Sakal
पुणे : लष्कराच्या ‘बेस वर्कशॉप ग्रुप’ आणि ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए) यांनी संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरण, संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे लष्करी आणि नागरी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.