esakal | पुण्यात कोरोनाच्या लढ्याला लष्कराचं बळ; डॉक्टर, परिचारिका अन् कर्मचारी धावले मदतीला
sakal

बोलून बातमी शोधा

Army Hospital provide beds and Doctor nurse to help Corona patients

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुण्यात कोरोनाच्या लढ्याला लष्कराचं बळ; डॉक्टर, परिचारिका अन् कर्मचारी धावले मदतीला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता लष्करही प्रशासनाच्या मदतीला धावून आले आहे. येथील लष्कराच्या रुग्णालयातील ३३० बेड्स गुरुवारपासून (ता. ८) उपलब्ध होणार आहेत. त्यात ६० व्हेंटिलेटर बेड्स असून, उर्वरित ऑक्सिजन बेड्सचा समावेश आहे. याशिवाय, या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारीही उपलब्ध होणार आहेत.

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील शुक्रवारी झालेल्या बैठकीत लष्कराच्या रुग्णालयातील बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंती करण्यात आली होती. त्यांनी लष्करप्रमुख यांच्यासमवेत चर्चा केली. त्यावर लष्कराकडून ३३० बेड्स उपलब्ध झाले आहेत. लष्कराचे रुग्णालय हे कोविड समर्पित रुग्णालय राहणार असून, ही सुविधा गुरुवारपासून उपलब्ध होणार आहे, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

'कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम''; पुण्यात व्यापाऱ्यांचे मानवी साखळी आंदोलन

याशिवाय प्रशासनाने दहा व्हेंटिलेटर खरेदीबाबत ऑर्डर दिली असून, परवापर्यंत ते ससून रुग्णालयास उपलब्ध होणार आहेत. सध्या ससून रुग्णालयात ८७ व्हेंटिलेटर बेड्स आहेत. ही संख्या शंभर बेड्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

loading image