
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे रखडलेल्या ‘आरोग्य सेवक ५० टक्के पुरुष’ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेत चार महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर निकाल जाहीर झाला आहे. यामुळे १२८ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.