
पुणे : ‘वारीची परंपरा ७०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. महाराष्ट्रात असे लाखो आहेत ज्यांना वारीला न गेल्यास वर्ष पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या पेलताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.