थकबाकी न भरल्यास आळंदीचा पाणी पुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply Scheme

भामा-आसखेड धरणातून पुण्यासाठी मिळणाऱ्या पाण्यातून आळंदी शहरासाठीही दिली जाते.

थकबाकी न भरल्यास आळंदीचा पाणी पुरवठा बंद

पुणे - भामा-आसखेड धरणातून पुण्यासाठी मिळणाऱ्या पाण्यातून आळंदी शहरासाठीही दिली जाते. पण आळंदी नगर परिषदेने पाणी पट्टी व पंपिंगचे २५ लाख ५३ हजार रुपये न भरल्यास १ आॅक्टोबरपासून आळंदीचा पाणी पुरवठा बंद करू असा इशारा महापालिकेने आळंदी नगर परिषदेला दिला आहे. त्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.

पुणे शहरासाठी भामा आसखेड धरणातून २.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर झाला आहे. भामा आसखेड ते पुणे शहर अशी सुमारे ६५ किलोमीटरची जलवाहिनी टाकून पाणी आणले जाते. यामुळे नगर रस्ता परिसरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. पण आळंदी नगर परिषदेकडूनही भामा आसखेड धरणातून पाण्याची मागणी केली जात आहे. त्यांना अद्याप पाणी कोटा मंजूर झालेला नाही तो पर्यंत तीन महिने महापालिकेने प्रक्रिया न केलेले पाणी आळंदी शहरासाठी देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी ९ फेब्रुवारी दिला होता. त्यानुसार १७ फेब्रुवारीपासून महापालिकेकडून आळंदी शहरासाठी पाणी दिले जाते.

त्यानुसार १७ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दिवसाचे ६ लाख २ हजार ५८१ रुपये पहिले बिल पाठविण्यात आले. त्यानंतर १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ पर्यंतचे १९ लाख ५१ हजार ११७ रुपयांचे दुसरे बिल पाठविण्यात आले आहे. हे बिल भरावे यासाठी महापालिकेने वेळोवेळी स्मरणपत्र पाठवले आहे. पण आळंदी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना लेखी किंवा फोनवरून कोणताही संवाद महापालिकेशी साधलेला नाही. आळंदी नगर परिषदेकडून मिळणे अपेक्षीत असलेली २५ लाख ५३ हजार ६९८ पाटबंधारे विभागाला भरायचे आहेत, त्यामुळे ही रक्कम द्यावी अशी मागणी महापालिकेने केली आहे. जर ही रक्कम भरली तर पूर्व सूचना न देता १ आॅक्टोबर २०२२ पासून महापालिकेकडून पाणी पुरवठा बंद केला जाईल, असा इशारा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिला आहे.

Web Title: Arrears Are Not Paid Alandi Water Supply Will Be Stopped

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Water supplyalandiArrears