‘संदीप देवकर खून प्रकरणातील फरारींना पकडा’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारामध्ये मागील वर्षी संदीप देवकर यांचा खून झाला होता. या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे करण्यात आली आहे.​

पुणे - येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारामध्ये मागील वर्षी संदीप देवकर यांचा खून झाला होता. या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येरवडा परिसरामध्ये स्टॉल टाकून ते बाहेरील व्यक्तींना चालविण्यास देण्याचा प्रकार आरोपींनी केला होता. त्यास देवकर यांनी विरोध केला होता. या कारणावरुन देवकर यांचा मागील वर्षी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारामध्ये पिस्तुलातून गोळ्या झाडून व फरशीने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी जावेद सय्यद याच्यासह चार आरोपींना अटक केली होती. याच गुन्ह्यातील अशरफ शेख व शोएब सय्यद यांना येरवडा पोलिसांकडून एक वर्षानंतरही अटक करण्यात अपयश आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर देवकर यांच्या कुटुंबीयांनी संबंधित प्रकरणातील फरारी आरोपींचा शोध घ्यावा, या गुन्ह्याचा तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा, यासाठी गुन्हे शाखेकडे तपास द्यावा अशी मागणी केली आहे. येरवडा पोलिस आरोपींना पाठीशी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrested absconders in Sandeep Devkar murder case Crime