esakal | फेसबुकवरील महिलांच्या फोटोचा असा करायचा गैरवापर...पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
sakal

बोलून बातमी शोधा

cybar crime

या संदर्भात ज्या महिलांची फसवणूक झाली असेल, त्यांनी न घाबरता पुढे येत बारामती तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. 

फेसबुकवरील महिलांच्या फोटोचा असा करायचा गैरवापर...पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : महिलांचे अश्लिल छायाचित्रे तयार करून मैत्रीची धमकी देणा-या एका महाभागाच्या बारामती तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संदीप सुखदेव हजारे (वय 29, रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा)   यास या प्रकरणी दहिवडी येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

गणेश खरात या बनावट नावाने फेसबुक अकाऊंटवरून शेकडो महिलांना रिक्वेस्ट पाठवायची, प्रोफाईलवरील त्यांचा फोटो क्रॉप करून त्यांचा चेहरा वापरून अश्लिल फोटो तयार करून त्यांना, माझ्याशी बोल, मैत्री कर..नाहीतर हे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी द्यायची, अशी संदीप हजारे याची कार्यपद्धती होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात तक्रारी आल्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे फौजदार योगेश लंगुटे,  पोलिस कर्मचारी परिमल मानेर, नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी तांत्रिक बाबींच्या सहाय्याने हा तपास केला. यात संदीप हजारे याने हा प्रकार केल्याचे निदर्शनास आले. त्याच्याविरुध्द  पुणे, घारगाव, कराड, संगमनेर, रत्नागिरी या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, राज्यामध्ये आणखी पोलिस ठाण्याला गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे .

या संदर्भात ज्या महिलांची फसवणूक झाली असेल, त्यांनी न घाबरता पुढे येत बारामती तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.