esakal | गोरक्षकासह त्याच्या मित्रांना मारहाण करणाऱ्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

गोरक्षकासह त्याच्या मित्रांना मारहाण करणाऱ्यांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रस्त्यावरील बेवारस गुरांना (Animal) भोसरी येथील पांजरपोळमध्ये घेऊन जाण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात (Fighting) तिघांनी गोरक्षकासह (Cowboy) त्याच्या मित्रांना लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण (Beating) केली. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वानवडीतील काकडे मैदान येथे घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांना अटक (Arrested) केली. (Arrested for beating up his friends including a cowboy)

शाहबाज अफजल कुरेशी (वय 27), अफजल यासीन कुरेशी व हसीना अफजल कुरेशी (वय 43) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गोरक्षक बद्रीनाथ रामास्वामी पार्थसारथी (वय 52, रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ पार्थसारथी हे गोरक्षक आहेत. वानवडी परिसरात बेवारस फिरणाऱ्या गायी, बैल व वासरांसाठी ते चारा-पाण्याची व्यवस्था करतात.

हेही वाचा: पुण्यातील तरुणांनी घेतला रुग्णसेवेचा वसा; हजारो रुग्णांना मिळतोय आधार

मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पार्थसारथी हे काकडे मैदानात बेवारस फिरणाऱ्या गुरांना टेम्पोमध्ये भरून भोसरीतील पांजरपोळ येथे सोडण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी शाहबाज व त्याच्या कुटुंबीयांनी पार्थसारथी यांना ते टेम्पोतून घेऊन जात असलेला बैल त्यांचा असल्याचा दावा केला. त्यावरुन शाहबाज, त्याचे कुटुंबीय व पार्थसारथी यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर आरोपींनी पार्थसारथी यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी पार्थसारथी यांचे दोन मित्र तेथे आले. त्यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा तपास भगवान कांबळे करीत आहेत.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा