esakal | पुण्यातील तरुणांनी घेतला रुग्णसेवेचा वसा; हजारो रुग्णांना मिळतोय आधार
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील तरुणांनी घेतला रुग्णसेवेचा वसा; हजारो रुग्णांना मिळतोय आधार

पुण्यातील तरुणांनी घेतला रुग्णसेवेचा वसा; हजारो रुग्णांना मिळतोय आधार

sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर (Pune): मागील वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोना बाधित झाले. गोखलेनगर, जनवाडी,वैदुवाडी या परिसरात झोपडपट्टी भाग असल्याने नागरिक आरोग्य सुविधेबाबत जागृत नव्हते, त्यामुळे कुटुंबच्या - कुटुंब कोरोना बाधित होऊ लागले. आरोग्य सुविधा तोकडी पडत असताना, आठ-दहा तरूण एकत्र येऊन रुग्णसेवा करण्याची शपथ घेतली. मागील एका वर्षापासून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा माणून, घरामध्ये बायका, लहान मुलं-बाळं असताना जीवावर उदार होऊन हे तरूण अविरत रुग्णसेवा कर्तव्य म्हणून करतात.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात 420 रुग्णालयांचे फायर ऑडिट

रुग्णांच्या घरी औषध फवारणी करणे, तपासणी केंद्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या गंभीर रूग्णाना बेड उपलब्ध करणे, सामान्य लक्षणे असलेल्या रूग्णाना विलिनीकरण बेड उपलब्ध करणे, होम आयसोलेशन मध्ये राहिलेल्या रूग्णाचा ऑक्सिजन चेक करणे, ऑक्सिजन लेवल कमी असल्यास रूग्णाना रूग्णालयात दाखल करणे, होम आयसोलेशन असताना मृत झालेल्या मृताची माहिती क्षेत्रीय कार्यालया मध्ये कळविणे, पी.पी.ई किट घालून मृतदेह बांधणे, शववाहिका उपलब्ध करून दहनाची व्यवस्था करणे, होम आयसोलेशन मधील रूग्णाना औषधे खासगी डॉक्टरांकडून घेऊन जाणे, रूग्णाना मानसिक आधार देणे, कोरोना जनजागृती करणे अशी अनेक कामे हे तरूण कोणताही मोबदला न घेता सामाजिक भावनेतून मोफत करतात. यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम यांचे सहकार्य लाभते. यामध्ये किरण पाचपुते, चंद्रकांत चव्हाण, हनुमंत शिंदे, देवेंद्र शितोळे, स्वप्नील राऊत, विशाल जाधव, चंद्रकांत चव्हाण हे तरुण काम करतात.

हेही वाचा: कोरोनाचा कहर अन् त्यातही आळंदीत ग्रामिण रूग्णालयात पार्किंगमध्ये चिकन पार्टी

"तरूणांचा खूप स्तुत्य उपक्रम आहे. स्वता:ची, कुटुंबाची काळजी न रात्री- अपरात्री, ऊन-पाऊस असतांना नागरिकांना मदत करतात. आजकालच्या युवा पिढीमध्ये सामाजिक भान ठेवून काम करण्याची गरज आहे. कौतुकास्पद काम आहे".

- संजय मयेकर, स्थानिक रहिवासी, गोखलेनगर.

loading image