
पुणे : वाहनचोरी करणारा अट्टल गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
उंड्री - वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून २,९५,००० रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल आणि दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. बच्चनसिंग जोगेंदरसिंग भोंड (वय २३, रा. बिराजदारनगर, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व पोलीस अंमलदार वानवडी, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ०१/०५/२०२२ रोजी गस्त घालत होते. त्यावेळी वैदवाडीजवळील नवीन पुलालगत संशयित गाडीवर थांबल्याची माहिती पोलीस नाईक शिवाजी जाधव यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयावरून आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने पुणे, सोलापूर असे विविध ठिकाणाहून वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीवर लोणीकंद, हडपसर-४, मोहोळ पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण, शिवाजीनगर, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, इतर 2 वाहनांबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Arrested Vehicle Theft
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..