esakal | पुणे : विजय मशालीचे साळुंके विहार येथे आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

विजय मशाल

पुणे : विजय मशालीचे साळुंके विहार येथे आगमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : १९७१ च्या भारत - पाक युद्धात भारताने विजय मिळविला, या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने देशभर ‘ स्वर्णिम विजय वर्ष ' साजरे केले जाते . यानिमित्त ' पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने सैन्याच्या शौर्यास मानवंदना देण्याच्या उद्देशाने स्वर्णिम मशालीचे भ्रमण संपूर्ण भारतभर होत आहे. मंगळवारी या मशालीचे साळुंके विहार येथील आर्मी वेल्फेअर को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये आगमन झाले. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सोसायटीच्या वतीने निवृत्त अधिकाऱ्यांनी स्वर्णिम मशालीचे स्वागत केले. मान्यवरांनी शहिद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच स्वर्णिम विजय वर्ष मशालीला मानवंदना देण्यात आली. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लहान मुले व महिलांनी सहभाग घेतला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेविका कालिंदा पुंडे, नगरसेविका नंदा लोणकर, निवृत्त ले. जनरल. बी टी पंडित, निवृत्त मेजर जनरल संदीप बिस्वास, जया हरोळी कर , निवृत्त कर्नल जे ए नाडकर्णी, ग्रुप कॅप्टन आर टी चंदानी, निवृत्त कर्नल बी सी जोगळेकर उपस्थित होते.

"१९७१ च्या युद्धादरम्यान सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमामुळे निर्णायक विजय मिळाला आणि हजारों पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले. ज्यामुळे या युद्धाची इतिहासात दैदिप्यमान कामगिरी म्हणून नोंद आहे. भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी कामगिरीची जबाबदारी आता आमच्यावर असून पुढील कार्यात अधिक यशस्वीपणे कारवाई करू असा विश्वास आहे."

- आर आर कामत , ब्रिगेडियर

loading image
go to top