मुले अन्‌ पालकांसाठी सोमवारी ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - नाताळच्या सुटीत काहीतरी नवीन शिकण्याची योजना तुम्ही करीत असाल, तर ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेत सहभागी होण्याचा छान पर्याय उपलब्ध आहे. मुले व पालकांना एकत्रितरीत्या स्वत:च्या हाताने वस्तू बनविण्याचा आनंद या कार्यशाळेच्या निमित्ताने घेता येणार आहे. 

पुणे - नाताळच्या सुटीत काहीतरी नवीन शिकण्याची योजना तुम्ही करीत असाल, तर ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेत सहभागी होण्याचा छान पर्याय उपलब्ध आहे. मुले व पालकांना एकत्रितरीत्या स्वत:च्या हाताने वस्तू बनविण्याचा आनंद या कार्यशाळेच्या निमित्ताने घेता येणार आहे. 

मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या वयोगटानुसार वेगवेगळ्या पेपर क्राफ्टची विभागणी केली आहे. या कार्यशाळेत सर्व साहित्य मिळणार असून फक्त फेव्हिकॉल, कात्री आणि रुमाल सोबत आणावा. ओरिगामी पेपर क्राफ्ट, पेन स्टॅंड, गिफ्ट बॉक्‍स, फ्रिज मॅग्नेट, पेपर क्राऊन, बॅटमॅन बॅग, पेपर क्विलिंग यासारख्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यांना नोंदणी करणे शक्‍य नाही, त्यांना कार्यशाळेच्या दिवशी प्रवेश देणार आहे. त्यासाठी प्रवेश मर्यादित आहे. या कार्यशाळेला संस्कृती आर्टचे सोमनाथ धाडगे यांचे सहकार्य लाभले आहे.

कार्यशाळेविषयी... 
 कोठे - अभिरुची मल्टिप्लेक्‍स मॉल, सिंहगड रोड 
 कधी - सोमवार (ता. २४)
 नोंदणीचे ठिकाण -
अभिरुची मॉल ॲण्ड मल्टिप्लेक्‍स, सिंहगड रोड 
(स. ११ ते सायं. ७)
 केव्हा - सायंकाळी ५ ते ६.३०
 नोंदणी शुल्क - १५० रुपये
 अधिक माहितीसाठी : ९५५२५३३७१३/ ८८०५००९३९५

वयोगटानुसार विभागणी 
 बालवाडी ते दुसरी : ओरिगामी पेपर क्राऊन, डॅंगलर्स 
 तिसरी व चौथी : हॅंड पपेट, एरोप्लेन, फ्रिज, मॅग्नेट 
 पाचवी व सहावी : पेन स्टॅंड, बॅटमॅन पेपर बॅग 
 सातवीपासून पुढे : राउंड गिफ्ट बॉक्‍स विथ बो, क्विलिंग फ्रिज मॅग्नेट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Art and Craft Workshop for Child and Parents