esakal | "मंडळांनो, यंदा गणेशोत्सवात गर्दी टाळा"
sakal

बोलून बातमी शोधा

गृहमंत्री वळसे पाटील

"मंडळांनो, यंदा गणेशोत्सवात गर्दी टाळा"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव हा घरगुती वातावरणात आणि साधेपणाने साजरा करावा आणि गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी (ता.९) पुण्यातील गणेश मंडळांना केले. गर्दी करण्यापेक्षा या गणेशोत्सवात गणेश मंडळांनी कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा: रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिली 1500 झाडे

पुणे परिवार संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या लोकमान्य जीवनगौरव, आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता आणि गणेश सेवा पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, पुणे पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अखिल मंडई गणेश मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, पुणे परिवार संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, विनायक घाटे, शिरीष मोहिते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा: पोलिस जनता दरबारात बारामतीत एकाच दिवशी १२८ अर्जांवर निर्णय

या समारंभात त्वष्टा कासार समाज संस्थेचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे यांना लोकमान्य जीवनगौरव, शिल्पकार विवेक खटावकर यांना गणेश सेवा पुरस्कार तर, किरण सोनिवाल, अनिरुद्ध येवले, प्रमोद राऊत, अमित जाधव, प्रशांत मते, स्वप्नील दळवी यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ नंदू घाटे, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे, पोलिस नाईक सतीश गाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: भ्रष्टाचाराच्या यादीत आणखी एक कॅबिनेट मंत्री- सोमय्या

कार्यक्रमाचे संयोजक अ‍ॅड.प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. गणेशोत्सवात पडद्यामागे काम करणारे अनेक कार्यकर्ते असतात. पण त्यांचे काम समाजापुढे येत नाही. अशा कार्यकर्त्यांचे काम पुढे आणण्याचा प्रयत्न या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे ॲड परदेशी यांनी यावेळी सांगितले. अमिताभ गुप्ता, हेमंत रासने यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.

loading image
go to top